Majhi Ladki Bahin Yojana Application Verification Process 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येणार असल्याची घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी केली. योजनेसाठी आलेल्या दोन कोटी ६३ लाख अर्जांपैकी पात्र ठरलेल्या दोन कोटी ४७ लाख अर्जांची सखोल पडताळणी होणार आहे. सरकारच्या मते, अर्ज बाद करण्यासाठी पाच महत्त्वाचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. (Majhi Ladki Bahin Yojana Application Verification Process 2025: Maharashtra’s government begins verification of applications under the Mazi Ladki Bahin Yojana. Learn about eligibility criteria, rejected application rules, and updates on financial assistance).
पडताळणीचे कारण आणि प्रक्रिया
अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी सांगितले की, वर्धा, पालघर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांमधून अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सध्या स्थानिक पातळीवर तक्रारनिहाय अर्जांची छाननी होईल. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक वगळता इतर सर्व अर्जांची तपासणी केली जाईल.
अर्ज बाद करण्यासाठीचे पाच महत्वपूर्ण निकष
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास.
- घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन तर महिलेच्या नावावर दुचाकी वाहन असल्यास.
- शासकीय नोकरीत असलेल्या लाभार्थींनी घेतलेला लाभ.
- इतर शासकीय योजनांचा लाभ घेतल्यास.
- विवाहानंतर परराज्यात गेलेल्या लाभार्थी.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खर्च आणि परिणाम
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सरकार वर्षाला ४६,००० कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे. याचा परिणाम इतर शासकीय योजना (Government Schemes) आणि पायाभूत सुविधांवर होण्याची शक्यता आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत बँक खात्याशी आधार लिंक असलेल्या २ कोटी ३४ लाख लाभार्थींना निधी वितरित करण्यात आला आहे.
महत्त्वपूर्ण माहिती मागविली जाणार
तटकरे यांच्या मते, प्राप्तिकर विभाग आणि परिवहन विभागाकडून घराचे एकत्रित उत्पन्न आणि चारचाकी वाहन मालकी आणि महिलेच्या मालकी वाहनाबाबतची माहिती मागविण्यात येत आहे. तक्रारींचे निराकरण आकडेवारीच्या आधारे केले जाईल.
🔴 हेही वाचा 👉 आज 3 जानेवारी 2025 रोजीचा सोन्याचा भाव येथे जाणून घ्या.
ही प्रक्रिया लाडकी बहीण योजनेच्या (Majhi Ladki Bahin Scheme) पारदर्शकतेसाठी अत्यावश्यक असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.