Majhi Ladki Bahin Yojana Latest News: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा 6 वा हप्ता कधी मिळणार? समोर आली आहे, याबद्दची मोठी अपडेट. (Majhi Ladki Bahin Yojana: The 6th installment for Maharashtra women beneficiaries is expected after 5th December 2024 as per recent updates).
Majhi Ladki Bahin Yojana December Installment Date: मध्य प्रदेशातील मेरी लाडली बहना योजनेप्रमाणेच महाराष्ट्रात 1 जुलैपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना आत्तापर्यंत जुलै ते नोव्हेंबर दरमहा 1500 रुपये याप्रमाणे 5 महिन्यांचे हफ्ते देण्यात आले असून लवकरच लाडक्या बहिनींच्या खात्यात 6व्या हफ्त्याचे 2100 रुपये जमा केले जाणार आहेत.
Mazi Ladki Bahin Yojana December Installment Date : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना (एकनाथ शिंदे), भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘महायुती’ला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महायुतीच्या या ऐतिहासिक विजयामागील मुख्य कारण म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Majhi Ladki Bahin Yojana आहे. सत्ताधारी महायुतीच्या लाडकी बहिन योजनेला प्रत्युत्तर म्हणून विरोधी महाविकास आघाडीने (एमव्हीए) महालक्ष्मी योजना जाहीर केली होती. ज्या अंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र लाभार्थी महिलांनी महायुतीवरच विश्वास व्यक्त केला. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
🔴 हेही वाचा 👉 तुमच्या खात्यात 2100 जमा होणार की नाही? ही नवीन यादी चेक करा Majhi Ladki Bahin Yojana New List Check Online.
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
पुन्हा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची रक्कम 1,500 वरून 2,100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन महायुतीने दिले होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील लाडक्या भगिनींना 1500 ऐवजी 2100 रुपये लवकरच देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार असून त्यात लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हफ्त्याची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.
🔴 हेही वाचा 👉 एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसंदर्भात मोठी घोषणा – पात्र महिलांना दरमहा 2100.
लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार?
Maharashtra’s Majhi Ladki Bahin Yojana To Continue, December Installment Expected: महायुती सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच माझी लाडकी बहीण योजनेच्या पाचव्या हप्त्याची आगाऊ रक्कम जमा केली होती. तेव्हापासून, लाभार्थी महिला पुढील हप्त्याची म्हणजेच लाडकी बहिन योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले आणि 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला. राज्यातील निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली. त्यामुळे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता 5 डिसेंबर नंतर जमा केला जाऊ शकतो.
🔴 हेही वाचा 👉 होय! याच आठवड्यात जमा होणार डिसेंबरचा हफ्ता, 1500 की 2100?.