लाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद पडणार? जानेवारी 2025 मध्ये निर्णय Majhi Ladki Bahin Yojana Future

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Judicial Update Maharashtra January 2025

Majhi Ladki Bahin Yojana Validity: राज्यातील महिला सशक्तीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू आहे. या योजनेसह अन्य कल्याणकारी योजनांवर जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, राज्याच्या आर्थिक स्थितीवर यामुळे परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा मांडण्यात आला आहे. (Majhi Ladki Bahin Yojana’s judicial review is pending in Nagpur Bench of Mumbai High Court. Key decision on this welfare scheme expected after 15th January).

याचिकेचा मुद्दा आणि न्यायालयीन कारवाई

Majhi Ladki Bahin Yojana Judicial Update: सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामध्ये, राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारखा अन्य योजनांमुळे तिजोरीवर ताण येईल आणि इतर सार्वजनिक कामांसाठी निधी उपलब्ध होणार नाही, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. न्यायालयाने सरकारला यापूर्वी उत्तर दाखल करण्यासाठी २३ ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली होती. मात्र, अद्याप उत्तर न आल्याने पुढील सुनावणी १५ जानेवारी रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सरकारची भूमिका

महायुती सरकारने सरकार नवीन स्थापन झाले असल्याचे कारण पुढे करत, उत्तर सादर करण्यासाठी अधिक वेळ मागितला आहे. तसेच, ही योजना राबविताना राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार केला जाईल, असेही सूचित केले आहे.

🔴 हेही वाचा 👉 पुढचा हप्ता कधी येणार? पात्रतेसंदर्भात मोठा निर्णय.

महत्त्वाचा निर्णय अपेक्षित

योजनेची पुढील वैधता आणि अंमलबजावणी यासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय जानेवारी 2025 मध्ये अपेक्षित आहे. यामुळे, राज्यातील सर्व लाभार्थींचे याकडे लक्ष लागले आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now