Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Next Installment Date : माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील पैसे जमा करण्यात आहे आहेत. अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात अजुनही पैसे जमा झाले नाहीत. ज्या महिलांनी जुलै आणी ऑगस्ट महिन्यात अर्ज केले होते आणी त्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांनी आपले बँक खाते तपासावे, तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana 3nd Installment Date : ज्या महिलांच्या बँक खात्यात जुलै आणी ऑगस्ट महिन्याचे दोनी हफ्ते मिळून 3000 रुपये जमा झाले होते आता त्यांना आता प्रतीक्षा आहे लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याची. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही.
जुलै महिन्यात माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली होती. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होताच लगेचच अनेक महिलांनी अर्ज भरले होते पण, काही महिलांनी कागदपत्रे अपूर्ण असणे वा ईतर काही कारणास्तव लगेच अर्ज केले नाहीत. त्यांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केले, त्यामुळे त्या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते.
ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज उशिरा मंजूर झाला होता त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात पैसे जमा होणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिन्याचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या महिलांना मिळणार फक्त 1500 रुपये?
ज्या महिलांनी 1 सप्टेंबर पासून अर्ज भरले आहेत अशा महिलांना जुलै आणी ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नसून त्यांच्या खात्यात फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होतील.