आता कुठेही करता येणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज? अर्ज प्रक्रियेत मोठा बदल Majhi Ladki Bahin Yojana New Gr

2 Min Read
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New Application Process 2024

Majhi Ladki Bahin Yojana Latest News :  १ जुलै २०२४ पासून महाराष्ट्र सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर लगेच अर्ज प्रक्रिया देखील सुरु झाली आणी या योजनेला सबंध महाराष्ट्रातून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Mazi Ladaki Bahin Yojana Update : महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रमुख हेतूने राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत दीड कोटिहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. आणी अजून राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. सद्यस्थितीत या योजनेद्वारे पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याअंतर्गत योजनेच्या पहिल्या दोन हफ्त्यांची रक्कम 3000 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

नुकताच राज्य सरकारकडून या योजनेबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेत आता महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.

आता इथून पुढे माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फक्त आंगणवाडी सेविकांकडेच करता येणार आहे.

काय आहे नवीन शासन निर्णय

राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेबाबत घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आत्तापर्यंत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका, समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager). सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आशा सेविका आणी आपले सरकार सेवा केंद्र यांना या योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी नेमण्यात आले होते. पण, सरकारच्या नवीन निर्णयानुसार इथून पुढे अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यात येतील. इतर सर्व नेमलेल्या व्यक्तिना अर्ज स्वीकारण्याचे देण्यात आलेले अधिकार आता रद्द करण्यात आले आहेत.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article