PM Kisan 18 Va Hafta in Marathi : जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला भारत सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या (PM Kisan Nidhi) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल माहिती असेलच. या योजनेंतर्गत, भारत सरकार प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला वर्षातून तीन वेळा 2 हजार रुपयांची आर्थिक मदत करते. आता पर्यंत शेतकऱ्यांना 17 हफ्ते देण्यात आले असून आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता जाहीर होणार असला तरी त्यापूर्वी शेतकऱ्यांना काही चुका सुधारणे गरजेचे आहे. हे करणे अतिशय महत्वाचे आहे कारण जर तुम्हीसुद्धा या चुका केल्या असतील आणी त्या वेळेत सुधारल्या नाहीत तर तुम्हाला 18 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊयात काय आहेत त्या चुका. (Avoid these mistakes to ensure you receive the 18th installment of PM Kisan Yojana. Check and correct your details today to secure your Rs. 2000 benefit)…
ज्या शेतकऱ्यांनी या चुका केल्या असतील त्या लवकर दुरुस्त करा
अर्जामधील चुका (नवीन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी)
तुम्ही जर पीएम किसान योजनेच्या लाभासाठी अर्ज केला असेल, तर साहजिकच तुम्ही पीएम किसान योजनेचा फॉर्म भरला असेल. अशा परिस्थितीत, तुमच्या फॉर्ममध्ये कोणतीही चूक नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. तुमचे नाव, पत्ता किंवा आधार क्रमांक यासारखी इतर कोणतीही माहिती चुकीची असल्यास तुम्हाला हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे तुमच्या फॉर्ममधील चुका आजच दुरुस्त करा.
बँक खात्याची माहिती
पीएम किसान योजनेअंतर्गत, हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. हे पैसे डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. त्यामुळे तुम्ही दिलेली बँक खात्याची माहिती बरोबर असल्याची खात्री करा. बँक खात्याची माहिती, ifsc कोडं इत्यादी बरोबर असल्याची खात्री करा.
ई-केवायसी
तुम्हाला लाभार्थी म्हणून हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल, तर तुम्ही निर्धारित वेळेत ई-केवायसी करणे गरजेचे आहे. पीएम किसान योजनेच्या हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी हे सर्वात महत्वाचे काम आहे. ई-केवायसी न केलेले शेतकरी 18 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात.
जमीन पडताळणी आणि आधार लिंकिंग
पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी जमिनीची पडताळणी करा, हे काम करायला विसरू नका. अन्यथा तुमचा हप्ता अडकू शकतो त्याचप्रमाणे, हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, तुमच्यासाठी आधार लिंकिंग करणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे लागेल.
वरील सर्व कामे केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.