शेतकऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच खात्यात जमा होणार 2000 रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

2 Min Read
PM Kisan Yojana 19th Installment February 2025 Update

PM Kisan Yojana 19th Installment February 2025 Update: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत ठरत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये (2000 रुपये प्रति हप्ता) जमा केले जातात. आतापर्यंत 18 हप्ते लाभार्थींच्या खात्यात जमा झाले असून, फेब्रुवारी 2025 मध्ये पिएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. (PM Kisan Yojana 19th Installment Update 2025: Farmers to receive ₹2000 in February 2025 under the PM Kisan Yojana. Learn about eligibility, eKYC, application process, and more).

पिएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार?


पंतप्रधान किसान योजनेचा 18 वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये जारी करण्यात आला होता. यानंतर चार महिने पूर्ण झाल्यावर 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीज होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी हा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे संकेत आहेत.

पिएम किसान योजनेसाठी अर्ज कसा कराल?


जर तुम्ही अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नसेल, तर खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही अर्ज करू शकता:

  1. PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. ‘New Farmer Registration’ वर क्लिक करा.
  3. आधार क्रमांक, राज्य, जिल्हा, वैयक्तिक व बँक माहिती भरा.
  4. फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.

ई-केवायसी करणे महत्त्वाचे


पिएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana 2025) लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा.

पिएम किसान योजनेसाठी कोण पात्र नाही?


या योजनेसाठी खालील शेतकरी पात्र नाहीत:

  • जे शेतकरी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत.
  • ज्या शेतकऱ्यांच्या बँक तपशील आणि आधार कार्डवरील माहिती मध्ये विसंगती आहे, जसे की आधार आणि बँक खात्याची माहिती जुळत नाही.
  • बिगर शेतकरी किंवा ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत 13 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळाली आहे. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी मोठी मदत ठरत आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now