ही आहे सरकारची जबरदस्त पेन्शन योजना, मिळतील वर्षाला 36 हजार रुपये Pension Yojana Maharashtra Marathi

2 Min Read
PM Shram Yogi Mandhan Yojana

PM Shram Yogi Mandhan Yojana In Marathi : देशातील करोडो लोक असंगठित क्षेत्राशी संबंधित आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या जीवनात अनेक आर्थिक अडचणी येतात, ज्यामुळे त्यांना दैनंदिन खर्च भागवून गुंतवणूक करणे कठीण होते. अनेक वेळा, काम न मिळाल्यामुळे त्यांना बेरोजगार राहावे लागते. परंतु, अशा लोकांचे जीवनमान सुधारन्यासाठी भारत सरकार एक अतिशय चांगली योजना राबवात आहे, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असं या योजनेच नाव आहे. (PM Shram Yogi Mandhan Yojana provides financial assistance to workers in the unorganized sector. Eligible workers receive ₹36,000 annually after 60 years. Find out how to apply and the necessary documents for registration).

योजनेचे उद्दिष्ट:

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असंगठित क्षेत्रातील श्रमिकांना 60 वर्षांच्या वयानंतर मासिक 3,000 रुपये पेंशन देणे आहे, जी रक्कम वार्षिक 36,000 रुपये होते. ही योजना 18 ते 40 वर्षे वय असलेल्या असंगठित क्षेत्रातील सर्व श्रमिकांसाठी उपलब्ध आहे. अर्ज करताना, लाभार्थ्याला त्याच्या वयावर आधारित पेंशन योजना निवडायला मदत मिळते.

कशी आहे ही पेंशन योजना:

  • 18 वर्ष वय असलेल्या अर्जदारांसाठी: त्यांना 55 रुपये प्रति महिना गुंतवणूक करावी लागेल, आणि 60 वर्षांपर्यंत त्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणे सुरु होईल.
  • 40 वर्ष वय असलेल्या अर्जदारांसाठी: त्यांना 200 रुपये प्रति महिना गुंतवणूक करावी लागेल, त्यांना 60 वय पूर्ण झाल्यावर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणे सुरु होईल.

लाभार्थ्यांचे 60 वय पूर्ण झाल्यावर, लाभार्थ्यांना दर महिना 3,000 रुपये पेंशन मिळेल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

या योजनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यक आहे:

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • ओळखपत्र
  • मोबाइल नंबर
  • पत्र व्यवहारासाठी कायमचा पत्ता
  • वयाचे प्रमाणपत्र

(PM Shram Yogi Mandhan Yojana) श्रम योगी मानधन योजना असंगठित क्षेत्रातील श्रमिकांसाठी असणारी एक महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर योजना आहे. या योजनेत अल्पशी गुंतवणूक केल्याने 60 वर्षांनंतर श्रमिकांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळेल आणि या योजनेमूळे त्यांचे भविष्य काहीसे सुरक्षित होईल.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now