Ladki Bahin Yojana Next Installment: पुढचा हप्ता कधी येणार? पात्रतेसंदर्भात मोठा निर्णय!

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Next Installment Date Big Update on Beneficiary Eligibility

Majhi Ladki Bahin Yojana Next Installment Date and Big Update on Beneficiary Eligibility: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक पाठबळ ठरली आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यावर दर महिन्याला ₹1,500 ची थेट आर्थिक मदत डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे जमा करते. दिवाळीपूर्वी चौथा आणि पाचव हप्ता एकत्रितपणे जमा करण्यात आला होता. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी योजनेच्या हफ्त्यात वाढ करून निवडणुकीनंतर पात्र महिलांना दरमहा ₹2100 देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणूक होऊन बरेच दिवस झाले तरी लाडकी बहीण योजनेचा 6वा हफ्ता जमा न झाल्याने आता महिलांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. (Get the latest update on the Majhi Ladki Bahin Yojana. Know when the next installment will be credited, eligibility criteria, and the government’s strict review process for beneficiaries. Stay informed about Maharashtra’s ₹1,500 monthly financial aid scheme).

पुढचा हप्ता कधी जमा होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या वतीने योजनेची अंमलबजावणी गतिमान करण्यात आली आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत सहावा हफ्ता वितरित करण्याची तारीख निश्चित होईल. आणी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा 6 वा हफ्ता वितरित करण्यात येईल. जर पडताळणी प्रक्रियेस विलंब झाला तर पुढच्या महिन्यात 14 जानेवारी पर्यंत 6वा हफ्ता वितरित केला जाईल.

कुणाला मिळणार नाही पुढचा हप्ता?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनात योजनेतील पात्रतेच्या निकषांवर पुनरावलोकन करण्याचे संकेत दिले आहेत. योजनेचा लाभ अशा काही महिलांना मिळाला आहे, ज्या योजनेच्या ठरवलेल्या निकषांमध्ये बसत नाहीत. त्यासाठी पडताळणी करून अपात्र महिलांना लाभार्थी यादीतून वगळले जाईल. 

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिनींच्या पडताळणीसाठी 50,000 योजनादूत सज्ज.

काय आहेत अपात्रतेची कारणे?

  • योजनेचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदार महिलांना लाभ मिळणार नाही.  
  • आर्थिक स्थिती योजनेच्या मर्यादेपेक्षा अधिक असल्यास.  

🔴 हेही वाचा 👉 पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या संख्येने अर्ज बाद, अनेक महिलांचे अर्ज मंजूर पण जमा झाले नाहीत पैसे.

महत्वाची तारीख:

सरकारने लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहाव्या हप्त्याचे वितरण करण्याचे संकेत दिले आहेत.

🔴 हेही वाचा 👉 डिसेंबरचा हफ्ता जमा न झाल्यास येथे नोंदवा तक्रार.

नवीन अर्ज करणाऱ्यांसाठी

राज्य सरकारने फक्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवीन अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रे अचूक भरावीत आणि सरकारने नमूद केलेल्या अटी व शर्ती पूर्ण कराव्यात. 

🔴 वाचायला विसरू नका 👉 लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल? आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now