Ayushman Bharat Yojana News Today : अल्प आणि निम्न मध्यम उत्पन्न गटाला आरोग्य संरक्षण देणारी केंद्र सरकारची प्रमुख आरोग्य योजना ‘आयुष्मान भारत योजना’ सरकारच्या नवीन निर्णयामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेत आता प्रत्येक कुटुंबातील 70 वय वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड मिळवायचे असेल, तर तुम्हाला या योजनेसंदर्भातील काही महत्त्वाचे निकष माहित असणे आवश्यक आहे.
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठीचे पात्रता निकष
आयुष्मान कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही खालील निकषांची पूर्तता करत आहात याची खात्री आवश्य करा.
- 1. उत्पन्न मर्यादा: तुमचे मासिक उत्पन्न ₹10,000 पेक्षा जास्त नसावे.
- 2. लाभार्थी श्रेणी: लाभार्थी SC-ST किंवा EWS श्रेणीतील असणे आवश्यक आहे.
- 3. घर आणि शेतजमीन: तुमच्याकडे स्वतःचे घर आणि 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी.
हे लोक घेऊ शकतं नाहीत आयुष्मान भारत योजनेचा लाभ
- – वाहन: ज्यांच्याकडे दुचाकी, कार किंवा ऑटो रिक्षा आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतं नाहीत.
- – फिशिंग मोटर बोट: ज्यांच्याकडे मासेमारीसाठी मोटर बोट असेल ते लाभ घेऊ शकत नाहीत.
- – यांत्रिक कृषी उपकरणे: ज्यांच्याकडे कृषी कामासाठी यांत्रिक उपकरणे आहेत ते लाभ घेऊ शकणार नाहीत.
- – सरकारी नोकरी: केंद्र किंवा राज्य सरकारच्या सरकारी नोकरीला असणार्र लोक योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
- – किसान क्रेडिट कार्ड: ज्यांच्याकडे ₹50,000 पेक्षा जास्त मर्यादेचे किसान क्रेडिट कार्ड आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
- – बिगर कृषी उद्योग: जे लोक सरकारच्या व्यवस्थापनाखाली चालणाऱ्या बिगर कृषी उद्योगांमध्ये काम करतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- – जास्त मासिक उत्पन्न: ज्यांचे मासिक उत्पन्न ₹10,000 पेक्षा जास्त आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
- – रेफ्रिजरेटर किंवा लँडलाइन फोन: ज्यांच्या घरी रेफ्रिजरेटर किंवा लँडलाइन फोन आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
- – पक्क घर आणि शेतजमीन : ज्यांच्याकडे राहायला पक्क घर किंवा ५ एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ते आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
आयुष्मान कार्डची मर्यादा वाढणार?
आयुष्मान कार्डची मर्यादा ₹5 लाखांवरून ₹10 लाखांपर्यंत वाढवण्याबद्दल चर्चा सुरु आहे. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर देशातील 50 कोटी लोकांना आणि जवळपास 5 ते 7 कोटी वृद्धांना मोठा दिलासा मिळू शकतो. आयुष्मान भारत योजना ही आरोग्य संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची योजना आहे, पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला विहित निकष पूर्ण करावे लागतील. तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.