Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Payment Date Update : राज्य सरकारने जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. अनेक महिलांनी अर्ज प्रक्रिया सुरु होताच लगेच अर्ज दाखल केले तर अनेक महिलांना काही कारणास्तव लगेच अर्ज करणे शक्य झाले नाही. 14 ऑगस्ट पासून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. ज्यांचे अर्ज या तारखेपूर्वी मंजूर झाले होते त्यांच्या खात्यात जुलै आणी ऑगस्ट या दोन महिन्याचे 3000 रुपये जमा झाले. पण काही महिलांनी जुलै महिन्यात अर्ज करून सुद्धा त्यांचा अर्ज लवकरच मंजूर न झाल्याने त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते.
त्यानंतर अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केले. सुरुवातीला अर्ज करण्याची शेवटची तारिख 31 ऑगस्ट होती ती 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली असल्याने अजून नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु आहे.
आता महिलांचे लक्ष ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) लागून राहिले आहे. तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. महिलांच्या खात्यात तो नेमका कधी जमा केला जाणार आहे? लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय आहे? किती रूपये खात्यात जमा होणार आहेत? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. अशाच तुमच्या मनातील सर्व शंकासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा.
खात्यात किती पैसे जमा होणार?
ज्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात 3000 रुपये जमा झाले होते त्यांच्या खात्यात आता 1500 रुपये जमा होणार आहेत हे तर सर्वानाच माहित आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे त्या महिलांच्या खात्यात आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे मिळून 4500 रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे. तसेच ज्या महिलांनी 1 सप्टेंबर पासून अर्ज भरले असतील आणी जर त्यांचा अर्ज मंजूर झाला असेल तर त्यांच्या खात्यात फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. ‘सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना जुलै आणी ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नाही’.
खात्यात पैसे कधी जमा होणार ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून अद्याप नेमकी अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या 4 दिवसात बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.