Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Benefit Details 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Mazi Ladki Bahin Yojana) सध्या पात्र महिलांना 1500 रुपये देण्यात येतात, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा ₹2100 इतकी रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता काही लाभार्थी महिलांना 1500 रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळू शकते. त्यामागील कारण म्हणजे एखाद्या महिलेस केंद्र अथवा राज्य सरकारच्या इतर योजनांचा आर्थिक लाभ मिळत असल्यास, लाडकी बहीण योजनेतून त्या रकमेतील तफावत भरून दिली जाईल. (Explore details of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, its Rs.1500 benefit distribution, eligibility, and how other scheme benefits affect the payout. Aditi Tatkare clarifies GR rules).
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) योजनेबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या, “पात्र महिलांना संपूर्ण लाभ मिळेल याची खात्री केली जाईल. मात्र, जर महिलेकडून इतर योजनांचा लाभ घेतला जात असेल आणि ती रक्कम 1500 रुपयांपेक्षा कमी असेल, तर उर्वरित रक्कमच लाडकी बहीण योजनेतून भरून दिली जाईल.”
महत्त्वाचे मुद्दे:
- योजना निकष: जर केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांमधून लाभ घेतला जात असेल आणि ती रक्कम ₹1500 पेक्षा कमी असेल, तर फक्त तफावत भरून दिली जाईल.
- उदाहरण: जर एखाद्या महिलेला सरकारच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत ₹1000 मिळत असतील, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून फक्त उर्वरित ₹500 दिले जातील.
- क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया: पात्र लाभार्थ्यांची खात्री करण्यासाठी महिला व बालविकास विभाग, आयकर विभाग, तसेच अन्य संबंधित विभागांसोबत समन्वय साधला जाईल.
🔴 हेही वाचा 👉 या महिलांना मिळणार नाहीत १५०० रुपये, यात तुमच नाव आहे का? तपासा.
माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम वाढीची प्रतीक्षा
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत या योजनेची रक्कम ₹1500 वरून ₹2100 करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी या योजनेतील सुधारणा लवकरात लवकर होण्याची अपेक्षा आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय कधी घेणार? मंत्री अदिती तटकरे यांनी केला मोठा खुलासा.
28 जून 2024 चा शासन निर्णय
28 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार, पात्र महिलांना क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्थिक लाभ दिला जाईल.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra) या महत्त्वाकांक्षी योजनेत काही अटी आणि निकषांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेची रक्कम आणि प्रक्रियेतील पारदर्शकता यामुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत होईल.
🔥 हेही वाचा 👉 पडताळणी नंतर लाडकी बहिण योजनेचा अर्ज पात्र ठरला कि अपात्र? कस समजणार.