Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले आहेत, यातील दीड कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा करण्यात आली आहे. अनेक महिलांच्या अशा तक्रारी येत आहेत की आमचा अर्ज Approve झाल्याचा मेसेज आला आहे तरीदेखील आमच्या खात्यात अजून पैसे जमा झालेच नाहीत. यामागची सत्य परीस्थिती काय आहे ते जाणून घेऊयात…
Maharashtra News: महाराष्ट्र सरकारने 1 जुलैपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. त्यानंतर लगेचच माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सबंध महाराष्ट्रातून लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले. त्यानंतर 14 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली.
आता दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरणास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत. तर अनेकांच्या बँक खात्यात पैसे जमा होणे अजून बाकी आहे.
सध्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यात काही महिला जुलै महिन्यात तर काही ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या आहेत. त्यांच म्हणणं असं आहे की आम्हाला अर्ज Approve झाल्याचा मेसेज आला आहे पन आमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. आम्हाला पैसे मिळतील की नाही?
कुणाच्या खात्यात पैसे जमा झाले आणी कुणाच्या नाही?
1 जुलै ते 31 जुलै दरम्यान अर्ज केला असल्यास:
ज्या महिलांनी 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान अर्ज केले होते. त्यांच्या खात्यात जुलै आणी ऑगस्टचे 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. पण यातील अशा काही महिला होत्या ज्यांच आधार बँक खात्याशी लिंक नव्हतं त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. ज्यांनी आधर बँक खात्याशी नंतर लिंक करून घेतलं आहे अशा महिलांच्या खात्यात आता दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा होतील.
1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान अर्ज केला असल्यास:
ज्यांनी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान अर्ज केला होता त्यातील अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पण ज्यांचे अर्ज ऑगस्ट महिन्याच्या शेवटी Approve झाले आहेत त्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा केले जात आहेत.
ज्या महिलांना अर्ज Approve झाल्याचा मेसेज आला आहे त्यांना कसलीच चिंता करण्याची गरज नाही त्यांच्या खात्यात योजनेचे पैसे नक्कीच जमा होतील. राज्यातील प्रत्येक पात्र महिलेला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असल्याच स्वतः (Cm Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीही सांगितलं आहे.