PM Kisan Yojana 18th Installment Date : जेव्हा तुम्ही एखाद्या सरकारी योजनेसाठी पात्र असतात आणी मग त्यासाठी तुम्ही अर्ज करून त्या योजनेत सामील होता तेव्हा तुम्हाला त्या योजनेचे लाभ मिळतो. सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी साकार योजनांचा प्रचार करते. अशीच केंद्र सरकारद्वारे राबावली जाणारी एक योजना आहे जी शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली असून त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेतला तर तुम्हालाही या योजनेद्वारे सरकारकडून देण्यात येणाऱ्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो. आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता जारी केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हालाही हा 18 वा हप्ता मिळवायचा असेल, तर तुमच्यासाठी दोन कामे वेळेत पूर्ण करणे महत्वाचे आहे. ती कामे कोणती आहेत ते जाणून घेऊयात…
PM किसान योजना 18 व्या हप्त्याची तारीख?
पीएम किसान योजनेअंतर्गत, प्रत्येक हप्ता सुमारे चार महिन्यांच्या अंतराने येतो. जर आपण मागील म्हणजेच 17 व्या हप्त्याबद्दल बोललो तर तो जून महिन्यात रिलीज झाला होता. अशा परिस्थितीत, पुढील म्हणजेच 18 व्या हप्त्याची (चार महिन्यांची वेळ) ऑक्टोबरमध्ये संपत आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात हा हप्ता जारी केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
PM किसान योजनेचा 18 वा हप्त्या मिळण्यासाठी या दोन गोष्टी पूर्ण करणे गरजेचे
तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची पडताळणी करून घेणे. तुम्हाला तुमचा हप्ता अडकू नये असे वाटत असेल तर हे काम लवकरच पूर्ण करून घ्या.हे काम निर्धारित वेळेत पूर्ण न केल्यास तुम्हाला १८ व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.
जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत ते हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहतील. प्रत्येक शेतकऱ्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य असल्याचे विभागाकडून आधीच सांगण्यात आले आहे.
जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल, तर तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट http://pmkisan.gov.in वर जाऊन 2 मिनिटात ई-केवायसी करू शकता.
तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन देखील ई-केवायसी करू शकता.